Wednesday, April 22, 2026
Google search engine

केंद्र क्रमांक 0834  जगन्नाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालय वणी  ऐवजी आदर्श हायस्कुल वणी 

केंद्र क्रमांक 0834  जगन्नाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालय वणी  ऐवजी आदर्श हायस्कुल वणी 

सुरेंद्र इखारे वणी :-     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती ,विभागीय मंडळ अमरावती अंतर्गत होणाऱ्या फेब्रुवारी मार्च 2025 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेकरिता केंद्र क्रमांक 0834 जगन्नाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालय वणी ऐवजी आदर्श हायस्कुल वणी हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. तेव्हा केंद्र क्रमांक 0834 च्या परीक्षार्थींनी आदर्श हायस्कुल वणी या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी केंद्र क्रमांक 0834 जगन्नाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालय वणी या केंद्राची पहाणी केली असता . त्या केंद्रावर परिक्षेकरिता लागणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव असल्याने शिक्षणाधिकारी जयश्री राऊत यांनी तात्काळ परीक्षा केंद्र बदलविण्याची शिफारस केली . त्या शिफारशींचा विचार होऊन तात्काळ नीलिमा टाके विभागीय सचिव यांनी वणी येथील आदर्श सेकंडरी व हायर सेकंडरी स्कुल वणी याना देण्यात आले आहे. तेव्हा केंद्र क्रमांक 0834 असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वणी येथील आदर्श हायस्कुल वणी या केंद्रावर परीक्षा द्यावी . या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही भौतिक सुविधतेत कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी व मंडळाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही व विद्यार्थी परिक्षेपासून वंचीत राहणार नाही याची काळजी घ्यावी. तेव्हा केंद्र क्रमांक 0834 असणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी वणी येथील आदर्श हायस्कुल वणी या केंद्रावर परीक्षा द्यावी असे आवाहन विभागीय सचिव अमरावती, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व परीरक्षक वणी 055 यांनी केले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular