जैताई मंदिरात
भारत माता पूजन उत्सव व व्याख्यान
सुरेंद्र इखारे वणी :-
संस्कार भारती, सागर झेप बहुउद्देशीय संस्था व जैताई
देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता मंदिराच्या प्रांगणात भारत माता पूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त डॉ.
प्रा.करमसिंग
राजपूत यांचे ‘ युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘
या विषयावर सुश्राव्य व्याख्यान आयोजिले आहे.
या प्रसंगी यापूर्वी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिकेही
प्रदान केली जाणार आहेत.तरी या कार्यक्रमाचा
लाभ बंधु भगिनींनी बहुसंख्येने घ्यावा अशी विनंती
आयोजकांनी केली आहे.