धुलीवंदनाच्या दिवशी गुद्दलपेंडीच्या नाड्याची पूजा करून परंपरा कायम
रात्री रंगणारा गुद्दलपेंडीचा खेळ लुप्त होतोय; पुढाकाराची गरज
सुरेंद्र इखारे वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी या शहराची ओळख ही बहुगुणी अशी आहे. कारण वणीला सांस्कृतिक वारसा आहे, ऐतिहासिक शहर, पांढरे सोने, ब्लॅक डायमंड सिटी, अशा विविधांगाने ओळख कायम ठेवून आहे. परंतु हिंदूंचा सण होळी या सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी रात्री रंगणारा खेळ गुद्दलपेंडी हरवण्याच्या मार्गावर असून वणी शहराची संस्कृती कायमठेवण्यासाठी नृसिंह व्यायाम शाळेच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन रात्री खेळला जाणाऱ्या गुद्दलपेंडी खेळाच्या नाड्याची पूजा करून वणी शहराची ओळख जोपासली आहे.
गुद्दलपेंडी हा खेळ वणी शहराकरिता वेगळा नसला तरी या खेळाने वणी शहराची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात व अन्यत्र पोहचली आहे. हा खेळ मनगटाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ आहेत. आपल्या शहराची ओळख कायम राहावी यासाठी वणी शहरातील नागरिकांनी, पुढार्यांनी व प्रशासनाने पुढाकार घेतला तर पूर्वीपासून सुरू असलेली गुद्दलपेंडीची परंपरा कायम राहील. अन्यथा धुलीवंदनाच्या दिवशी रात्री खेळला जाणारा गुद्दलपेंडीचा खेळ लुप्त होईल . तेव्हा वणी शहराची संस्कृती कायम ठेवण्यासाठी विचारमंथनाची गरज आहे. या खेळामुळे वणी शहर परिसरातील जातीय सलोखा व शांती कायम आहे.
गुद्दलपेंडी हा खेळ गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. धुलीवंदनाच्या दिवशी रात्री खेळला जात होता. त्यामुळे ही परंपरा कायम राहावी म्हणून नृसिंह व्यायाम शाळेचे सदस्यांनी पुढे येऊन गुद्दलपेंडीच्या नाळ्याची पूजा करून दोन खांबाला नाळा बांधून दोन मल्ल आमने सामने उभे राहून एकमेकांवर गुददया चा प्रहार करतात हा खेळ पाहण्यासाठी वणीकर मोठ्या संख्येने उपस्थित असतात . परंतु ही गुद्दलपेंडीची परंपरा कायम राहावी म्हणून गुद्दलपेंडीच्या नाड्याची पूजा करून खेळ आटोपता घेत आहे त्यामुळे गुद्दलपेंडीच्या खेळाडूत नैराश्य दिसून येत आहे.परंतु ही परंपरा कायम राहावी म्हणून नृसिंह व्यायाम शाळेचे उपाध्यक्ष बाबूलाल पोटदुखे, मोरेश्वर बॉंडे, सूर्यकांत मोरे, शिवरात्रीवार, अजय बोबडे, यांनी पुढाकार घेतला..