Friday, April 18, 2025
Google search engine

वणीत शहीद दिनी विविध मागण्यासाठी महा जेलभरो संपन्न

वणीत शहीद दिनी विविध मागण्यासाठी महा जेलभरो संपन्न

विधानसभेत सरकारचे लक्ष वेधण्याचे आमदार संजय देरकारांचे आश्वासन

सुरेंद्र इखारे वणी :- शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या स्व. साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती करपे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनाचे निमित्याने शेतकरी शेतमजूर, निराधार व दिव्यांग्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प.) व श्रीगुरुदेव सेना यांचे वतीने लक्षवेधी महा जेलभरो आंदोलन  २३ मार्च दुपारी २ वाजता दिलीप भोयर यांचे नेतृत्वात येथील पोलीस स्टेशनमध्ये संपन्न झाले.

या आंदोलनाची सुरवात वसंत जीनिंग कार्यालया पासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाला वंदन करून पोलिस स्टेशन वणी येथील दक्षता सभागृहात भरगच्च गर्दीने जेलभरो करण्यात आला.

यात दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या करण्यात आल्या यात सर्व निराधार , लाडकी बहीण कलावंत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहिना मानधन ५ हजार करण्यात यावे, निराधारांच्या उत्पन्नाची अट २१ हजारावरून १ लाखापर्यंत करण्यात यावी, निराधारांचे वय ६० वर्षे करण्यात यावे, सर्व कलावंताच्या मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मान्य करावे, निवडणुकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ई व्ही एम बंद करण्यात याव्या, शेतकऱ्याच्या शेती साहित्य (बी- बियाणे,रासायनिक खते, औषधे व शेती अवजारे) या वरील जी. एस. टी. रद्द करण्यात यावी. वणी शहरातील राज्य मार्ग क्रमांक ३१५ च्या रस्ता बांधकामाचे तांत्रिकदृष्ट्या ऑडिट करण्यात यावे ,
सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी,शेतमजूर १२ बलुतेदार यांची ( मायक्रो फायनान्स, पतसंस्था,खाजगी सावकार, बँकांचे कर्ज ) यातून सर्वांना कर्ज मुक्त करावे, शेती पंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा , शेतकऱ्याच्या कापसाला किमान १२ हजार रुपये, सोयाबीनला ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांना १० हजार रुपये मासिक बेरोजगार पत्ता देण्यात यावा,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे निविदा विषयक नियम धाब्यावर बसवून काम करणाऱ्या जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई व आर. व्हि. उंबरकर कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम तांत्रिक दृष्ट्या ऑडिट करण्यात यावे,
वणी मुकूटबन घोन्सा चौफुली ते पुरड (नेरड) पर्यंतच्या मार्गावर सुमारे ६० करोड रूपय खर्चुन सुध्दा काम नित्कृष्ट झाले आहे. करिता या मार्गाचे बांधकाम पुनःश्चा करण्यात यावे. वणी शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा मार्गावरील रेल्वे गेट पर्यंत चालु असलेले रस्ता बाधकाम अत्यंत निकृष्ठ असुन काम मागील अनेक दिवसांपासुन बंद आहे. सदरचे काम नियमबाह्य पध्दतीने केले आहे. त्याची संपुर्ण चौकशी करून संबंधीत अधिकारी व कंत्राटदारावर सक्त कारवाई करण्यात यावी, सा. बां. विभाग पांढरकवडा जि. यवतमाळ यांचे कडुन सन २०१६ ते २०२४ पर्यंत खनिज विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेले सार्वजनिक सभागृहाची चौकशी करण्यात यावी. तसेच गावा गावातील बसविण्यात आलेले जल शुध्दीकरण यंत्र पुर्णता बंद आहे. या जलशुध्दी करण यंत्राची चौकशी करावी व संबधीत कंत्राटदार व अधिकारी यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, नव्याने प्रस्तावित असलेले जिल्हा सत्र न्यायालयाची ईमारत ज्या जागेवर बांधण्यात येणार आहे. ती जागा वणी शहराच्या कार्यक्षेत्रा बाहेर आहे. त्यामुळे सर्व सामन्य नागरीकांना त्या ठिकाणी येणे जाणे करणे अत्यंत अवघड होणार असुन नागरीकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्या इमारतीची जागा वणी शहरात उपलब्ध करून त्या ठिकाणी न्यायालयाची ईमारत बांधण्यात यावी. मौजा परसोडा येथे ही ईमारत बांधुन मुख्यालयात बदल होत आहे, वणी शहरातील ग्रामिण रुग्णालयात मागील अनेक वर्षापासुन ट्रामा केअर सेंटर बांधण्यात आले आहे. त्याचे बांधकाम पुर्ण झाले आहे. त्या ठिकाणी लागणारे करोडो रूपयाचे साहित्य धुळखात पडले आहे. त्या साहित्याचा रुग्णांना कोणताही लाभ मिळत नसल्याने परनामी त्यांना त्यांचा जिव गमवावा लागत आहे. त्यामुळे सदर ट्रामा केअर सेंटर तात्काळ सुरू करण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, वणी येथील कोळशाची रेल्वेसाठी हटविण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे, या आंदोलनात शेतकरी शेतमजुर कलावंत , दिव्यांग व निराधार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे, जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण वैद्य, विधानसभाध्यक्ष सूर्यकांत खाडे,रामदास पखाले, पुंडलिक मोहितकर, शहराध्यक्ष विनोद ढेंगळे, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या आंदोलन यशस्वी करण्यासाठी मंगेश गोरे, प्यारेलाल मेश्राम, सौ.रत्‍नाबाई पारखी, निर्मलाबाई मडावी, राजू झाडे,वसंतराव कोहळे, अमोल वाघाडे, शिवाजीराव डाखरे,ज्ञानेश्वर कोडापे, सिंधुबाई गोरे, पुंडलिकराव कोंगरे, रंगरावजी भोयर, प्रतिमा मडावी, शोभा तुरानकर, भाऊराव दुरटकर, मेघबाई भगत, बालाजी गुरनुले, पंचफुलाबाई मंगाम, आदी परिश्रम घेत आहे.

 

आंदोलकांच्या मागण्या विधानसभेत मांडणार – आमदार संजय देरकर यांची ग्वाही

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्रीगुरुदेव सेनेच्या लक्षवेधी जेलभरो आंदोलनाला वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी भेट दिली व आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आणि निवेदनातील सर्व मागण्यासाठी विधानसभेत मांडणार अशी ग्वाही दिली आली आंदोलनाला भगवी झेंडी दाखवून आंदोलनाची सुरवात केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular