वणी येथे संस्कृत संभाषण शिबिर संपन्न.
सुरेंद्र इखारे वणी :- संस्कृत भाषा ही भारताच्या ज्ञाननिधीच्या महान खजिन्याची गुरुकिल्ली असल्याने सर्वसामान्य प्रत्येक माणसाला संस्कृत भाषेबद्दल आत्मीयता असावी आणि त्यांना संस्कृत भाषेत संवाद करता यावा यासाठी कार्यरत संस्कृत भारतीच्या वणी शाखेद्वारा आर्य वैश्य महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शरद कोंडावार यांचे निवासस्थानी दि. १६ ते २३ मार्च २०२५ या कालावधीत संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या वर्गाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. गजाननजी कासावार प्रमुख अतिथि स्वरूपात उपस्थित होते.
संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा आहे. आपण संस्कृत चे अध्ययन केले तरच आपण आपल्या संस्कृतीला समजून घेऊ शकतो आणि तिचे रक्षण करु शकतो. संस्कृतचा अभ्यास केल्यास बुद्धी प्रगल्भ होते, उच्चार शुद्ध होतात तसेच आत्मविश्वास निर्माण होतो असे प्रतिपादन गजानन कासावार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्य वैश्य महिला आघाडी च्या अध्यक्षा सौ. कीर्ति कोंडावार यांनी केले तर आभारप्रदर्शन वर्ग शिक्षिका प्रा. सौ. प्रणीता भाकरे यांनी केले.