*पुरुष गटाच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे थाटात उदघाटन*
सुरेंद्र इखारे वणी: वणी तालूका स्पोर्टस फॉउंडेशन व तालुका क्रीडा मंडळ वणी द्वारा पुरुष गटाच्या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचेआयोजन वणी शहरात शासकिय मैदान पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित संघ सहभागी होत असून भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजयजी देरकर हे होते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारिणीची सदस्य विजयजी चोरडिया प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून जय जगन्नाथ को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजयजी खाडे तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी गणेशजी किंद्रे, वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर, वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक वाघमारे मॅडम, अंकूश बोढे,रमेश बोबडे, भारतभाउ गारघाटे,सुधाकर काळे, संजय देवाळकर, सचिन ढोके, लक्ष्मण ढेंगळे, दिलीप भोयर,डी. टी. धानोरकर, फैजल खान बशीर खान, मोहीते सर, सतीश तेढेवार,रवी वांढरे,वैभव ठाकरे, घनशाम आवारी,नारायण गोडे, प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रितेश लखमापुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जय हिंद क्रीडा मंडळ वरोरा व तालुका क्रीडा मंडळ वनी या दोन महिलांच्या संघात रोमहर्षक असा प्रेक्षणीय सामना पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बेलेकर तर आभार प्रदर्शन निखिल वैरागडे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा मंडळाचे पदाधिकारी राजू रिंगोले, मयूर पिदूरकर, आकाश कावडे, गणेश गौरकार, आदित्य आवारी, साहिल काकडे, बादल धांडे,सागर खाटीक तसेच तालूका क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.