Friday, April 18, 2025
Google search engine

महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त संविधान जागर लघुनाट्य

महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त संविधान जागर लघुनाट्य
नागपूर ( जयंत साठे ) नागार्जुन कॉलनी बहुउद्देशीय संस्था जरीपटका नागपूर यांचे द्वारे महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन 11.04.2025 ला करण्यात आले . उत्तर नागपूर विभागाचे आमदार डॉ.नितिन राऊत यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. एम एस जांभुळे लेखक व गीतकार यांनीही महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य थोडक्यात समजावून सांगितले. डॉ. एम एस जांभुळे लिखित व डॉ. विना राऊत दिग्दर्शित संविधान जागर लघु नाट्याचा 121 वा प्रयोग सादर करण्यात आला. प्रा. भीमराव गायकवाड, मंगला जांभुळे, नंदा पंचभाई, जया कलीहारी, सुनंदा गायकवाड, वंदना धनविजय, डॉ वीणा राऊत व डॉ एम एस जांभूळे या कलावंतांनी वरील नाट्यात भाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular