Wednesday, November 12, 2025
Google search engine

पिंपळशेंडे यांचा थाटात अमृतमहोत्सवी सत्कार.

पिंपळशेंडे यांचा थाटात अमृतमहोत्सवी सत्कार.

सुरेंद्र इखारे वणी    :-  तालुक्यातील पूरड नेरड येथील माजी पोलीस पाटील तथा रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष झिंगूजी पिंपळशेंडे यांचा 75व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्य सहपत्निक मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जोपासून समाजात वावरणारे बोटावर मोजण्याइतकेच बघायला मिळतात झिंगूजी पिंपळशेंडे मात्र याला अपवाद ठरतात. त्यांचा मितभाषी स्वभाव, सदाबहार दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणुन त्यांची सर्वत्र ओळख झाली आहे असे प्रतिपादन वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार उपस्थित होते. पाहूणे म्हणून आमदार संजयभाऊ देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , शिक्षण प्रसारक समिती वणीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंगराव गोहोकार, माजी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोदजी पटोले, रास्त भाव दुकानदार संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष भगवंतराव राऊत , सुरेश मालेकर उपस्थित होते.
सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. प्रास्ताविक विवेक मांडवकर यांनी केले. राष्ट्रवंदनेनी कार्यक्रमाची सांगता झाली.याप्रसंगी बहुसंख्य स्नेही व पुरड येथील नागरिक उपस्थित होते यशस्वितेसाठीबंडू देवाळकर , प्रविण झाडे, सुनिल ठाकरे, राकेश लक्षेटीवार, वसंतराव मोहितकर, श्याम बोडे, दयाळ भगत, उमेश परेकर, नागेश धनकसार, नंदकिशोर खारकर, अरविंद थेरे, संजय खारकर, बबनराव ठावरी, अमोल मालेकर तसेच मित्र परिवार पूरड ग्रामवासी यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular