लोकमान्य टिळक महाविद्यालयात योग दिनाचे आयोजन.
सुरेंद्र इखारे वणी :- २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात नियमित स्वरूपात आयोजित होत असल्याने योग वर्गात योग दिनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. यांना नैसर्गिक जीवन पद्धतीच्या माध्यमातून निरोगी शरीर आणि निकोप मन जोपासणे हा आपला नित्यक्रम असायला हवा असे आवाहन केले.
नंदकुमार गुरुकर यांच्या मार्गदर्शनात राजकुमार पाचभाई आणि नामदेवराव जेणेकर यांनी उपस्थितांच्याद्वारे नियोजित योगासने आणि प्राणायाम करवून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांनी केले.
याप्रसंगी योग प्रशिक्षण वर्गातील गणमान्य नागरिकांच्या सोबत महाविद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





