Monday, January 12, 2026
Google search engine

कायरच्या विवेकानंद विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव व एक पेड माँ के नाम उत्साहात साजरा

कायरच्या विवेकानंद विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव व एक पेड माँ के नाम उत्साहात साजरा

मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले

सुरेंद्र इखारे वणी :-   तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयात शैक्षणिक सत्र 2025 -26 च्या पहिल्याच दिवशी विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व एक पेड माँ के नाम हा उत्सव उत्साहात साजरा केला.

यावेळी श्री रामकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव सतीश घुले ,व संचालक रामजी गोंडलावार ,मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे, विज्ञान शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार , सोनाली भोयर, सचिन टोंगे, मधुकर कोडपे, दिलीप कंदस्वार, आकाश बोरूले, पालक ज्योती निमसटकार , लक्ष्मीबाई निमसटकार, व विद्यार्थी उपस्थित होते. प्रवेशोत्वा प्रसंगी विद्यालयाच्या अध्यापिका सोनाली भोयर यांनी सर्व विद्यार्थ्यांना औक्षवंत करून पुष्पगुच्छ व सोनपापडी देऊन त्यांचे तोंड गोड केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने “एक पेड माँ के नाम “ या मोहिमेअंतर्गत इको क्लब फॉर मिशन लाईफच्या माध्यमातून आई ज्योती व मुलगी समीक्षा , मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी “इकोक्लब “ च्या संदर्भात विज्ञान शिक्षक मधुकर घोडमारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच वर्ग 8 वि च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. तसेच शालेय पोषण आहारातील मेन्यू मसुरडाळीची खिचडी व गोड पदार्थ सोनपापडी देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. व पसायदानाने प्रवेशोत्सवाची सांगता झाली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular