अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यवतमाळच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
सुरेंद्र इखारे वणी :- थोर समाजसुधारक, आरक्षणाचे जनक, त्याचप्रमाणे सामाजिक क्रांतीचे प्रणेते, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यवतमाळचे वतीने वेतन विभाग कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यवतमाळचे अधीक्षक श्री माननीय प्रदीपजी गोडे साहेब यांचे शुभहस्ते, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमा पुजन,माल्यार्पण व दिपप्रज्वलन करण्यात आले होते.याप्रसंगी श्री.आशिष वाघाडे साहेब, श्री.हांडे साहेब, श्री.गांवडे साहेब, प्रकाशभाऊ दाडे साहेब, सन्माननीय मिर्झा मॅडम, श्री.राजुभाऊ होले , श्री.शशीभाऊ धानोरकर, श्री.अगम भाऊ, श्री.दिलीप डाखरे,आदी मान्यवर/कर्मचारी वृंद उपस्थित होते.प्रतिमा पुजनानंतर , माननिय श्री.प्रदीपजी गोडे साहेब यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक , शैक्षणिक ,शेती विषयक कार्याबदल मार्गदर्शन केले.सामुहिक विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





