Tuesday, January 13, 2026
Google search engine

जीवनाय यश प्राप्त करायचे असेल तर ध्येय निश्चित करणे आवश्यक- प्रवीण माहिरे

जीवनाय यश प्राप्त करायचे असेल तर ध्येय निश्चित करणे आवश्यक- प्रवीण माहिरे
काष्ट्राईब तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार थाटात संपन्न

नागपूर (जयंत साठे ) जीवनात अपयश आल्याने खचून जाऊ नये, अपयश नंतर यश मिळणारच. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे भविष्याची वाटचाल करावी असा संदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण माहिरे यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आणि डाँ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘बार्टी’ यांचे संयुक्त विद्यमाने 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी सामाजिक न्याय भवन सभागृह येथे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण गाडे, अध्यक्ष काष्ट्राइब महासंघ, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत कुलकर्णी,प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, सुकेशनी तेलगोटे, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर, अनिल काळे, प्रकल्प व्यवस्थापक बार्टी, डॉ.नारायण सूर्यवंशी, अधिष्टाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा, ऍड अजय निकोसे निवृत्त सरकारी अधिवक्ता होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये प्रा रमेश पिशे, प्रा राहुल मुन, श्यामराव हाडके, राहुल कांबळे, अशोक पाटील, रवी पोथारे,माया उके, राजेश ढेंगरे, रेखा लोखंडे,उपस्थित होते.
उपस्थित वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी गुणवत्ताप्राप्त 200 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान देणारे अविनाश नागदेवते व छाया कुरुटकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकमाचे संचालन सिताराम राठोड, प्रस्तावना प्रा डॉ. वंदना इंगळे, आभार, नागेश वाहूरवाघ यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular