Tuesday, January 13, 2026
Google search engine

प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्याकडून गजानन तायडे यांच्या तब्येतीची विचारपूस!

प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्याकडून गजानन तायडे यांच्या तब्येतीची विचारपूस!
नागपूर ( जयंत साठे ) पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आदरणीय प्रा .जोगेंद्र कवाडे सर यांनी दिनांक 21 जुलै 2025 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता मलकापूर येथे भेट देऊन पीआरपी चे जिल्हा उपाध्यक्ष गजानन तायडे यांच्या तब्येतीची विचारपूस करून घटलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली.
मागील आठवड्यात जिल्हा बुलढाणा लोणार तालुक्यातील वेणी या गावांमध्ये जातीवादी समाजकंटकांकडून निळ्या झेंडा उध्वस्त करून बौद्धांवर टाकल्या गेलेल्या सामाजिक बहिष्कारच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांना धीर देण्याकरिता दिनांक 15 जुलै रोजी वेणी येथे गेलेले पीआरपीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे सह गजानन तायडे जिल्हा नेते भिका इंगळे मधुकरराव शिंदे गजानन ठोसर हे भेट देऊन परत येत असताना पूर्व नियोजित असा तेथील जातीवादी गावगुंडांनी त्यांच्यावर सामूहिक हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये पीआरपीचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष गजानन तायडे यांच्या दोन्ही पायांवर मोठा मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले याची माहिती कळताच दिनांक 21 जुलै रोजी आदरणीय प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी आपले सहकारी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले यांना सोबत घेऊन मलकापूरातील पंतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन गंभीर जखमी असलेल्या गजानन तायडे यांच्या तब्येतीची मोठ्या आस्थेने विचारपूस केली. त्याच बरोबरच या हल्ल्यात दुसरे जखमी झालेल्या गजानन ठोसर ह्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही भेट घेऊन त्यांना धीर दिला. या भेटीदरम्यान मलकापूर शहरातील व आजूबाजूच्या गावातील मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular