Saturday, May 16, 2026
Google search engine

बांबूच्या वस्तूच्या विक्रीतून आदिवासी समाज स्वावलंबी होईल: डॉ. अविनाश घरडे

बांबूच्या वस्तूच्या विक्रीतून आदिवासी समाज स्वावलंबी होईल: डॉ. अविनाश घरडे

सुरेंद्र इखारे वणी    :- स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आदिवासी कलाकृती प्रोत्साहन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजाच्या अनंत समस्या आहेत त्यापैकीच एक रोजगार होय म्हणून बांबूपासून सुंदर सुबक पर्यावरण पूरक हस्तकलेच्या वस्तू बनविणे व त्यातून एक सन्मानजनक रोजगार तयार करणे याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांनी आपल्या विचारातून आंतरराष्ट्रीय पातळीवर बांबू पासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना मोठी मागणी आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करून त्याची विक्री केल्यास आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन स्वावलंबी बनेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. बंडुजी कोरझरे यांनी स्वयंनिर्मित बांबू पासून तयार केलेल्या विविध वस्तूचे प्रदर्शन व विक्री केली तसेच स्वतःच्या अनुभव व्यक्त करत असताना फक्त नोकरीवर अवलंबून न राहता स्वयंरोजगारावर भर द्यावा. तसेच मंचावर उपस्थित डॉ. सोडणर सर यांनी कौशल्य अंगी असेल तर कामाचा वनवा नाही, अशी अनेक उदाहरणं जगात आहेत. म्हणूनच शासनदेखील किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम प्रशिक्षणावर भर द्यावा लागेल व आदिवसीमध्ये असणाऱ्या उपजत कलागुणांना वाव दिला पाहिजे तर डॉ. गायकवाड सर यांनी कच्चा मालाचे रूपांतर पक्का मालामध्ये केले तर भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब देशमुख तर आभार प्रदर्शन डॉ. नितेश राऊत यांनी केले. यावेळी बांबूनिर्मित वस्तूचा प्रदर्शन करिता महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून प्रोत्साहित केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता रासेयो विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular