Monday, January 12, 2026
Google search engine

चिखलगाव येथील आदर्श जेष्ठ नागरिक मंडळाची  वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

चिखलगाव येथील आदर्श जेष्ठ नागरिक मंडळाची 
वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सुरेंद्र इखारे वणी  :-  तालुक्यातील चिखलगाव येथील आदर्श जेष्ठ नागरिक मंडळाची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 21 ऑगस्ट ला शंकरबाबा देवस्थान चिखलगाव येथे संपन्न झाली.

या सभेचे अध्यक्षस्थानी  श्री.सुधाकरराव गारघाटे अध्यक्ष आदर्श जेष्ठ नागरिक मंडळ चिखलगाव हे होते. तर प्रमुख पाहुणे  श्री.उदयराव गोहोकार अध्यक्ष चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर,श्री.लक्ष्मण इद्दे कोषाध्यक्ष जिल्हा समन्वय समिती यवतमाळ,श्री.बाळासहेब राजुरकर अध्यक्ष क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनलय वणी,श्री.रमेश सुंकुरवार अध्यक्ष पोद्दार लर्निग स्कूल वणी,श्री.चंद्रशेखर खोंड अध्यक्ष केशव नागरी पतसंस्था वणी श्री पांडुरंग देठे अध्यक्ष शंकरबाबा देवस्थान,चिखलगांव तसेच श्री. दयालाल वानखेडे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी वणी,उपस्थित होते.
सर्वप्रथम मागील वर्षी दिवंगत झालेल्या सदस्यांच्या कार्याचा गुणगौरव करुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेचे प्रास्ताविकेतून  मागील वर्षी झालेल्या सर्व साधारण सभेचे अहवाल वाचन,जमा खर्च अहवाल वाचन व ईमारत बांधकाम बाबत आढावा श्री.जयप्रकाश राजुरकर सचीव यांनी मांडला.
या सभेला उदयराव गोहोकार यांनी उदयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय अधिवेशनातील नियोजन बद्ध कार्याची माहिती देऊन  विविध उपक्रमाबाबत माहिती दिली तर लक्ष्मण इद्दे यांनी जेष्ठ नागरिकांच्या आईस्काम व फेस्काम च्या कार्यपध्दती बाबत मार्गदर्शन करून आदर्श नागरिक मंडळाच्या उत्कृष्ट कार्याचा गुणगौरव करुन पुढील उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषनातुन श्री.सुधाकरराव गारघाटे यांनी मंडळाची वाटचाल व जेष्ठ नागरिकांच्या जीवनशैली बाबत मार्गदर्शन केले.
सभेचे बहारदार संचलन श्री.दिगंबरराव गोहोकार यांनी केले तर आभार  श्री.परशुराम ढुमणे यांनी मानले .शेवटी सर्वसाधारण सभेचा समारोप  श्री.वसंतराव उपरे यांच्या  पसायदानाणे झाला या सभेला बहुसंख्य जेष्ठ नागरिक सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular