Wednesday, November 12, 2025
Google search engine

विवेकानंद विद्यालयाच्या 1987 चे बॅचचा स्नेहमीलन सोहळा संपन्न

विवेकानंद विद्यालयाच्या 1987 चे बॅचचा स्नेहमीलन सोहळा संपन्न

सुरेंद्र इखारे वणी :-  तालुक्यातील नामवंत विवेकानंद विद्यालयाची 1987 ची दहावीची बॅच यांचा स्नेहमीलन सोहळा वणी- वरोरा रोडवरील महालक्ष्मी हॉल येथे 26 ऑक्टोबर2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गँगशेट्टीवार हे होते. प्रमुख पाहुणे श्रीरामकृष्ण शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा ठावरी काकू , सेवानिवृत्त मुख्याध्यापक सहायक शिक्षक व्ही बी टोंगे, हरिभाऊ चिखले, बोढे, लडके, मिलमीले, स्नेहलता चुंबळे, शिपाई निंदेकर, उपस्थित होते. सर्वोप्रथम दिवंगत गुरुजन वर्ग व माजी विद्यार्थी याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलननाणे करण्यात आली. यावेळी याप्रसंगी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा शाल,श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी अजय खडसे यांनी मान्यवरांचे आठवणींना गमतीजमतीं मध्ये उजाळा दिला. 1987 च्या बॅच च्या 5 वर्गाच्या 75 विद्यार्थ्यांनी परिचय दिला. तर काही विद्यार्थ्यांनी मनोगतातून विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान , सर्वगुणसंपन्न शिक्षण तसेच संस्कारातून विद्यार्थी घडले व आज चांगल्या हुद्यावर पोहचल्याचा आनंद व्यक्त केला . दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात गाणी,कविता, विनोद, नाटक, फिल्मी गीत सादर करून आपल्या सुप्त गुणब उजाळा दिला.तसेच बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार, पोलीस निरीक्षक राजेश औतकर, माजी नगरसेवक प्रमोद निकुरे, सहायक शिक्षिका बलकी मॅडम यांचे हस्ते माजी विद्यार्थ्यांना मोमेटो देऊन गौरविण्यात आले.   कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व आभार विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी प्रमोद निकुरे, शेखर वांढरे, अर्जुन उरकुडे, अजय जरूरकर, सुरेंद्र इखारे, जगदीश ठावरी, लडके,  सुभाष बिलोरिया , पवन कोठारी, अभय नागतुरे, विलास गंधेवार, संजय देठे, दिलीप आसकर, झाबक,नालमवार, यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular