Tuesday, March 10, 2026
Google search engine

कायरच्या विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जन्मशताब्दी निमित्य” जनजाती गौरव दिवस”साजरा

कायरच्या विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जन्मशताब्दी निमित्य” जनजाती गौरव दिवस”साजरा

  *“जनजाती गौरव पंधरवडा व जनजाती गौरव दिवस”*

सुरेंद्र इखारे वणी :-   कायर येथील विवेकानंद विद्यालयात 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत  जनजाती गौरव पंधरवाड्यात विद्यालयात विविध उपक्रम घेऊन आज भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने “ जनजाती गौरव दिवस” साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव सतीश घुले, सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडपे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर घोडमारे यांनी केले तर मनोगत सतीश घुले यांनी व्यक्त केले अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे म्हणाले बिरसा मुंडा यांनी आपले संपूर्ण जीवन आदिवासींच्या हक्कांसाठी समर्पित करून आज त्यांची ओळख ही “पृथ्वीचा पिता” म्हणून ओळखले जाऊ लागले असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत गोंडलावार यांनी केले तर आभार अक्षरा उपरे हिने मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आकाश बोरूले, दिलीप कंदस्वार, नुपूर थेरे, काळे, चिकणकर, चांदसूर्य, झोडे श्रुती बोरूले, शेंडे, या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम व पसायदान या गीताने झाली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular