वणीच्या विवेकानंद विद्यालयाचे टेनिक्वाईट मध्ये सुयश
सुरेंद्र इखारे वणी :- येथील विवेकानंद विद्यालयाची टेनिक्वाईट संघ यवतमाळ मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय स्पर्धेत अँग्लो हिंदी हायस्कुलचा पराभव करून फायनल मध्ये पोहचला.
टेनिक्वाईट संघात जुनेरा फातेमा मोहम्मद अख्तर, तमन्ना दत्तू ठाकरे, पूर्वा प्रदीप कस्तुरकर,जान्हवी सुधाकर गौरकार,तबसूम परवीन अब्दुल खालिद ,मानसी बाळकृष्ण कुशवाह, सय्यद खुशी सय्यद अहेमद, या खेळाडूंचा टेनिक्वाईट संघात समावेश होता. या टेनिकाईट खेळाडूंचे कौतुक श्रीरामकृष्ण शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ताराबाई ठावरी ,संस्थेचे उपाध्यक्ष प्रा शंकरराव वऱ्हाटे, सचिव अविनाश ठावरी, मुख्याध्यापक दिलीप आस्कर, उपमुख्याध्यापक बेसकर सर, पर्यवेक्षक राठोड सर ,यांनी केले तसेच प्रशिक्षक मार्गदर्शक जयंत मेश्राम सर, शैलेश नांदेकर सर यांचे अभिनंदन करण्यात आले या खेळातील खेळाडूंच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.




