Wednesday, April 22, 2026
Google search engine

वणी शिक्षण विभागाच्यावतीने नवोन्मेष अंतर्गत मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

वणी शिक्षण विभागाच्यावतीने नवोन्मेष अंतर्गत मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

सुरेंद्र इखारे वणी :-  तालुक्यातील नायगाव येथील सुशगंगा इंग्लिश मिडीयम स्कुल येथे दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोज सकाळी 10.30 ते 5.00 वाजेपर्यंत वणी पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने “नवोन्मेष उपक्रमाअंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तारअधिकारी निलेश हेडाऊ साहेब हे होते. प्रमुख अतिथी माजी मुख्याध्यापक राजेश पोटे, प्रधानमंत्री पोषणशक्ती आहार प्रभारी विनोद नासरे, विस्तारअधिकारी रमेश बोबडे, केंद्रप्रमुख गजानन भगत, तसेच प्रमुख मार्गदर्शक अभय पारखी, दिलीप आस्कर, निलेश बंदूरकर, उपस्थित होते.

मुख्यध्यपकांच्या कार्यशाळेची सुरुवात माननीय शिक्षणाधिकारी रवींद्रजी काटोलकर तसेच शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके यांनी व्हीसी द्वारे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी राजेश पोटे यांनी शालेय दस्ताऐवजातील कायम स्वरूपी व अल्प स्वरूपी अभिलेखाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर प्रमूख मार्गदर्शक निलेश बंदूरकर यांनी प्रधानमंत्री पोषणशक्ती आहार व विज्ञान विषयक योजना याबाबत माहिती दिली, दिलीप आस्कर यांनी शालेय अभिलेखे व विविध शिष्यवृत्ती याबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर अभय पारखी यांनी व्हिडीओ च्या माध्यमातून शालेय व्यवस्थापणेचे महत्व पटवून दिले व हा उपक्रम शिक्षकांना व व्यवस्थापनाला सक्षम बनविण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे असे विनोद नासरे यांनी प्रस्ताविकेतून सांगितले कार्यशाळेचे सूत्रसंचालन अभय पारखी यांनी केले तर आभार विनोद नासरे यांनी मानले

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी  वणी शिक्षण विभाग व सुशगंगा इंग्लिश मिडीयम स्कुलचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular