Wednesday, April 22, 2026
Google search engine

कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक  सुखदेव गौरकार यांचा  सेवानिवृत्ती निमित्ताने सपत्नीक सत्कार

  कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक  सुखदेव गौरकार यांचा  सेवानिवृत्ती निमित्ताने सपत्नीक  सत्कार
सुरेंद्र इखारे वणी   :आदर्श हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय घोन्सा ता. वणी येथील कर्तव्यदक्ष तथा प्रेमळ सौजन्य सौजन्यशील व्यक्तिमत्व प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री. मा.सुखदेव गौरकार सर यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  शाळेचे ज्येष्ठ शिक्षक  कैलास दाढे सर हे होते  प्रमुख पाहुणे घोन्सा येथील सरपंच  मंगेश मोहुर्ले, उपसरपंच बाळू भाऊ जीवने, माजी मुख्याध्यापक  मोहनराव उपरे सर,ग्रा. सदस्य व पालक प्रतिनिधी   विनोद पोटे,गणेश काकडे बाळू निखाडे सुनील काकडे विनोद उराडे उपस्थित होते  या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सुखदेव गौरकार सर यांच्या पत्नी सौ. सविता गौरकार मॅडम त्यांचे कुटुंबातील सदस्य सुद्धा उपस्थित होते. मान्यवराच्या हस्ते प्राचार्य मुख्याध्यापक श्री.गौरकार सर व त्यांच्या पत्नी सरिता गौरकार मॅडम यांचा शाल श्रीफळ साडी चोडी व एक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मुख्याध्यापक श्री.गौरकर सरांबद्दल सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  राजुरकर सर यांनी केले. तसेच पावडे सर उईके सर झाडे सर दुर्योधन सर तीरणकर मॅडम उमरे सर नवघरे मॅडम पेचे बाबू यांनी आपले सरांबद्दल अनुभव व्यक्त केले व भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक   करमणकर सर यांनी केले तर अभार  सुरेंद्र बुच्चे सर यांनी मानले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular