Tuesday, January 13, 2026
Google search engine

25 वर्षानंतर वर्ग, 10वी चे वर्गमित्रांचा स्नेहमीलन सोहळा संपन्न

25 वर्षानंतर वर्ग, 10वी चे वर्गमित्रांचा स्नेहमीलन सोहळा संपन्न

सुरेंद्र इखारे वणी : –   विवेकानंद विद्यालय नेरड (, पुरड )येथील सन 2000-2001या सत्राचे वर्ग 10 वी चे वर्गमित्र 25वर्षांनी “स्नेहबंध मैत्रीचे “या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. हा मैत्रीपूर्ण कार्यक्रम दि. 28डिसेंबर 2025 रोजी ‘राजवाडा ‘हॉटेल येथे स्नेहमीलन सोहळा संप्पन्न झाला. या कार्यक्रमात 16माजी विद्याथ्यांनी सहभाग घेतला. यावेळेस विद्याथ्यांनी शाळेतील जुन्या आठवणी जागा केल्या. याप्रसंगी विद्याथ्यांनी एकमेकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मनमोकळेपनाणे एकमेकांशी गप्पा मारल्या . यावेळेस शाळेत जे खेळ खेळल्या जात होते, ते खेळ तिथे खेळून मौजमज्जा केली तसेंच सर्वांनी एकत्रितरित्या भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन  करण्याकरिता राज उमरे, सागर गुडेकार यांनी पुढाकार घेतला. या मैत्रीपूर्ण कार्यक्रमासाठी निलिमा येरगुडे, शुभांगी उरकुंडे, जया कांबळे, ज्योत्स्ना तानकर, तानी सिडाम,मनीषा निब्रड,संजय थेरे, प्रतीक भगत, प्रवीण दुबे, अजय कुचणकार, गणपत आमने, सुभाष अस्वले, राजु वरारकर, सचिन थेरे हे जुने विद्यार्थी -विद्याथिनी सहभागी झाले होते. या पुर्नमिलनाने केवळ शाळेच्या जुन्या आठवणीच नव्हे तर जुन्या विद्याथ्यांच्या मनातही जुन्या दिवसाची गोड आठवण पुन्हा जागवली व जुन्या स्मृती जागृत झाल्या. सर्वासाठी हा सोहळा सस्मरणीय क्षण ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular