Monday, January 12, 2026
Google search engine

भालर येथील शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बालाजीपंत वरारकर यांचे निधन

भालर येथील शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बालाजीपंत वरारकर यांचे निधन

सुरेंद्र इखारे वणी :-   वणी तालुक्यातील भालर येथील सांबशिव पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय यवतमाळ येथील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक श्री बालाजीपंत सांबशिव वरारकर यांचे वयाचे 95 व्या वर्षी भालर येथील राहते घरी आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोज रविवारला  सकाळी 11.10 वाजता निधन झाले.

बालाजीपंत वरारकर यांनी शिक्षण क्षेत्रात क्रीडा शिक्षक म्हणून उत्तम कामगिरी,तंटामुक्ती चे अध्यक्ष , कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय पंच म्हणून काम पाहिले, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व असलेले बालाजी पंत याना तीन मुले एक मुलगी मोठा मुलगा प्रवीण वरारकर डॉक्टर , अरुण वरारकर प्राध्यापक, तर  सुनील वरारकर वणी पंचायत समितीचे माजी सभापती व मुलगी सीमा खुटेमाटे, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे. आज सायंकाळी भालर येथील त्यांचे शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular