Thursday, April 23, 2026
Google search engine

भुवनेश्वर येथे जेष्ठ नागरिकांचे अखिल भारतीय अधिवेशन उत्साहात संपन्न 

 भुवनेश्वर येथे जेष्ठ नागरिकांचे अखिल भारतीय अधिवेशन उत्साहात संपन्न 

वणीच्या हौशी जेष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

सुरेंद्र इखारे वणी  :-  अखिल भारतीय जेष्ठ नागरिक मंडळ *आयस्काॅम* च्या वतीने आयोजित अखिल भारतीय जेष्ठ नागरिकांचे अखिल भारतीय अधिवेशन दिनांक 22,23 फेब्रुवारी 2026 रोजी ओरीसा राज्यातील भुवनेश्वर येथे संपन्न झाले.
याअधिवेशनाचे उद्घाटन ओरीसा राज्यातील मंत्री व पदाधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाले.
या अधिवेशनात जेष्ठ नागरिकांचे मुलभूत हक्क,अधिकार व कर्तव्ये, कुटुंबातील सदस्यांच्या व शासनाच्या जबाबदा-या याविषयी तसेच महिला सबलीकरण,सायबर सुरक्षीतता, जेष्ठासाठी आर्थिक सुरक्षितता, शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी घ्यावयाची काळजी ई.विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.यावेळी जेष्ठ नागरिकांच्या हितासाठी एकूण 8 ठराव मंजूर करण्यात आले व ते शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले.यात जेष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासातील सर्व डब्यात 50 टक्के सवलत देण्यात यावी, सरकारी व खासगी पेंशन न मीळणा-या सर्व जेष्ठ नागरिकांना पेंशन देण्यात यावे, सर्व सरकारी कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागु करावी,जेष्ठ नागरिकांसाठी ठेवीवर व्याजाचा दर 3 टक्के वाढवुन देण्यात यावा, जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, जेष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण निश्चित करुन त्याची अंमलबजावणी करावी,इंकमटॅक्स मध्ये सुट मीळावी, जेष्ठ नागरिकांच्या पालन पोषण चा कायदा 2007 ची कठोर अंमलबजावणी करावी असे ठराव घेण्यात आले.
रात्रीला नेपाळ या देशातील कलाकारांसह ओरीसा,महाराष्ट्र,चंदीगड, राजस्थान,केरळ, पंजाब ईतर राज्यातील मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाले.या अधिवेशनासाठी नेपाळ या देशासह संपूर्ण देशभरातुन 1800 सदस्य सहभागी झाले होते त्यापैकी महाराष्ट्रातील 350 सदस्य व यवतमाळ जिल्ह्यातील चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर व आदर्श जेष्ठ नागरिक मंडळ चिखलगाव चे अध्यक्ष  उदयराव गोहोकार, सुधाकर गारघाटे व लक्ष्मण इद्दे यांचे मार्गदर्शनात 19 सदस्य सहभागी झाले होते.यानिमित्ताने सर्व सदस्यांनी जगन्नाथ पुरी, कोणार्क सूर्यमंदीर , बंगालच्या उपसागरातील गोल्डन बीच,भाग्योदय बीच मधील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेतला तसेच भुवनेश्वर येथील लिंगराज मंदीर,खंडगीरी,उदयगीरी, धवलगीरी यासारख्या  विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular