Thursday, May 28, 2026
Google search engine

वणीत मोठ्या उत्साहात लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा 301 वा जन्मोत्सव सोहळा

वणीत मोठ्या उत्साहात लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा 301 वा जन्मोत्सव सोहळा

प्रबोधनात्मक कार्यक्रमातून लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

सुरेंद्र इखारे वणी :-    येथील खंडोबा – वाघोबा देवस्थान सभागृहात दिनांक 31 मे 2026 रोज रविवारला सायंकाळी 7.00 वाजता भारतीय इतिहासावर आपल्या कर्तृत्वाने आपला अमीट ठसा उमटविणाऱ्या न्यायप्रिय अश्या लोकमाता, राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा 301 वा जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा राजेंद्र कोरडे अध्यक्ष, महाराणी अहिल्याबाई होळकर समाज प्रबोधन मंच, प्रमुख मार्गदर्शक प्रा विजय बोबडे सचिव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्व वाचनालय, मा सुजाता वीरकर वनपरिक्षेत्र अधिकारी, मा विद्या आत्राम नगराध्यक्षा न प वणी, मा संगीता खाडे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मल्टिस्टेट बँक वणी,मा प्रतिभा लोंढे अध्यक्षा राजमाता अहिल्याबाई होळकर महिला मंच उपस्थित राहणार आहे.

या अभिवादन सोहळ्याला वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील सर्व समाज बंधू भगिनींनी सहकुटूंब मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खंडोबा वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, राजमाता अहिल्याबाई होळकर महिला मंच, महाराणी अहिल्याबाई समाज प्रबोधन मंच वणी मारेगाव व झरी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय, धनगर अधिकारी/ कर्मचारी संघ वणी,मारेगाव व झरी यांनी केले आहे

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular