कायर येथील विद्यालयात विज्ञान मंडळाची कार्यकारिणी गठीत
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयात दिनांक 11 जुलै 2026 रोज शनिवारला सकाळी 9 .30 वाजता विद्यालयाचे सभागृहात विज्ञान मंडळाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. प्रमुख मार्गदर्शक विज्ञान शिक्षक मधुकर घोडमारे सर, रविकांत गोंडलावार, गणित शिक्षिका सोनाली ठाकूर ,प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडापे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शन विज्ञान शिक्षक मधुकर घोडमारे यांनी केले त्यानंतर विज्ञान मंडळाची कार्यकारिणी गठीत केली यामध्ये प्रामुख्याने विज्ञान मंडळाचे अध्यक्ष वर्ग 10 वि ची विद्यार्थिनी कु सानिका चांदसूर्य, उपाध्यक्ष सुमित शंकावार, सचिव चंचल झोडे, सदस्य कु आचल चिकणकर, कु खुशबू रागुलवार,कु हंसिका ठाकूर, दिलदार गुरनुले, रिषभ कोरांगे, अफाक पठाण यांची विद्यार्थ्यांमधून निवड करण्यात आली. याप्रसंगी मंडळाला शुभेच्छा देताना अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे म्हणाले की विज्ञान मंडळ हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेला एक उपक्रम आहे या उपक्रमाचे माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, वस्तूचे संग्रह करण्याची सवय लागावी, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तार्किक व शास्त्रीय विचार करायला शिकतात तसेच स्वतः प्रयोग करून शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करून जसे शाळास्तरावर विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजूषा, व्याख्यान, नाट्यउत्सव यासारख्या उपक्रमात सहभाग घेण्याची संधी प्राप्त होते असे मत व्यक्त करून विज्ञान मंडळाच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित शिक्षिका सोनाली ठाकूर यांनी केले तर आभार सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार यांनी मानले . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिपाई आकाश बोरूले व वर्ग 9 व 10 च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.





