Tuesday, July 28, 2026
Google search engine

कायर येथील विवेकानंद विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने” गुरुवंदना” कार्यक्रम संपन्न

कायर येथील विवेकानंद विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने” गुरुवंदना” कार्यक्रम संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात दिनांक 28 जुलै 2026 रोज मंगळवारला दुपारी 3.40 वाजताअनुगामी लोकराज्य महाभीयान अंतर्गत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने “गुरुवंदना “कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. प्रमुख मार्गदर्शक सौ संगीता भंडारवार मॅडम, सौ अंबिका पिंपळकर मॅडम, सहायक शिक्षक मधुकर घोडमारे ,सतीश घुले, रविकांत गोंडलावार, सौ सोनाली ठाकूर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर घोडमारे यांनी केले तर प्रमुख पाहुणे सौ अंबिका पिंपळकर यांनी विद्यार्थ्यांना विकसित भारत 2047 विषय प्रतिज्ञा दिली .प्रमूख मार्गदर्शन करताना संगीता भंडारवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये गुरुबद्दल कृतज्ञनेची भावना जागृत करून शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. सतीश घुले यांनी गुरुशिष्य परंपरा बद्दल माहिती दिली तर अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी आद्यगुरू महर्षी वेद व्यास यांच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमेचे महत्व विषद केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत गोंडलावार यांनी केले तर आभार सोनाली ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सचिन टोंगे, मधुकर कोडापे, आकाश बोरूले , अफक पठाण , सुमित शंकावार, सानिका चांदसूर्य, चंचल झोडे, खुशबू रागुलवार या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular