पिल्की वाढोणा येथे नेरड केंद्राची शिक्षण परिषद
ग्रामस्थांच्या पुढाकाराने ; जिल्हा परिषदेची बंद पडलेली प्राथमिक शाळा पूर्ववत
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील पिल्की वाढोणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 28 जुलै 2026 रोजी नेरड केंद्राअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे शिक्षण परिषद संमेलन आयोजित करण्यात आले होते .
या शिक्षण परिषद संमेलनाचे अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक किशोर नांदेकर हे होते. प्रमुख अतिथी माजी शिक्षण विस्तार अधिकारी सत्कार मूर्ती रमेश बोबडे , उपसरपंच सौ रत्नमाला अरुण झाडे , तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष काळे, केंद्रप्रमुख गजानन भगत ,सहायक शिक्षक प्रकाश तालावार उपस्थित होते .
याप्रसंगी शिक्षण परिषद संमेलनाचे प्रास्ताविक कायर केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन भगत सर यानी केले तर अकिब खान यांनी जयंत नारळीकर गणित- विज्ञान व खान अकादमी यावर प्रकाश टाकला, तसेच प्रकाश तालावार सर यांनी विनोबा अँपबाबत मोलाचे मार्गदर्शन केले .
यावेळी वणी तालुक्यातील नेरड केंद्रातील पिल्की वाढोणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हि मागील 3 वर्षांपासून बंद पडली होती . परंतु यावर्षी बंद असलेली शाळा पूर्ववत सुरु करण्याचे दृष्टीकोनातून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करून सुरू करण्यात आली. या संमेलनात सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी रमेश बोबडे सर यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला .शिक्षण परिषदेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम व प्रशासकीय बाबीचा आढावा घेण्यात आला .या संमेलनात केंद्रातील सर्व शिक्षक सर्व ग्रामस्थ, स्वयंसेवक .अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंद असलेली शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. शिक्षण परिषद संमेलनाचे सूत्रसंचालन प्रकाश तालावार यांनी केले तर आभार स्वयंसेविका पल्लवी पावडे हिने मानले
शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक, पिल्की वाढोणा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनि मोलाचे सहकार्य केले .






