Friday, July 31, 2026
Google search engine

चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर ची
वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सुरेंद्र इखारे वणी :-    चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 31 जुलै 2026 ला ला जेष्ठ नागरिक भवनात संपन्न झाली.या सभेचे अध्यक्ष श्री.उदयराव गोहोकार तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.बी.एन.ढोके अध्यक्ष जगन्नाथ जेष्ठ नागरिक मंडळ मारेगांव, कल्पनाताई पवार अध्यक्षा जेष्ठ नागरिक मंडळ मुकुटबन,निलीमाताई काळे अध्यक्षा जेष्ठ नागरिक महिला मंडळ वणी हे होते.सर्वप्रथम मागील वर्षात दिवंगत झालेल्या जेष्ठ नागरिक मंडळाच्या सदस्यांच्या कामाचा गुणगौरव करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी अति जेष्ठ नागरिक श्री.रुक्मानंद खाडे,श्री.शामराव गारघाटे व श्री.आनंदराव कौरासे यांचा शाल,नारळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर रूक्मानंद खाडे, शामराव गारघाटे,बी.एन.ढोके ,कल्पनाताई पवार व निलीमाताई काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकेतुन मंडळाच्या कार्या ची माहिती श्री.रामदास बोढे यांनी दिली, वार्षीक अहवाल वाचन श्री.लक्ष्मण इद्दे यांनी तर वार्षिक जमा खर्च श्री.सुभाष आत्राम यांनी सादर केला तर तर संचलन श्री.नाना विधाते यांनी केले व शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.महादेवराव खंगार, श्री.भास्करराव खारकर,श्री.गुलाबराव निते,श्री.सौरभ बोढे इ. नी सहकार्य केले.या सभेला 75 जेष्ठ नागरिक सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular