Tuesday, August 4, 2026
Google search engine

लोकमान्य टिळक महाविद्यालयात नशा छोडो भारत सवारो कार्यक्रम संपन्न*

*लोकमान्य टिळक महाविद्यालयात नशा छोडो भारत सवारो कार्यक्रम संपन्न*

सुरेंद्र इखारे वणी   :- शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी मध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने ” नशा छोडो भारत सवारो!” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अभिजित अणे हे होते.
प्रमुख वक्ते  पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
श्री शेखर वांढरे यांनी विद्यार्थ्यांनी नशेपासून दूर असावे व समाजात प्रतिष्ठेने जगावे असा सल्ला दिला.
कपिल पाटील यांनी तरुणांनी मोबाईलच्या तसेच इतरही व्यसनांनी आपले आयुष्य उध्वस्त करू नये असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रभारी प्राचार्य डॉ अभिजित अणे यांनी व्यसनाधीनतेने होणाऱ्या नुकसानींना अधोरेखित करीत स्वस्थ आणि संपन्न जीवनासाठी नशा मुक्तीचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विकास जूनगरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बिलोरीया यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ज्ञानेश्वर खामणकर ,प्रा. महादेव भुजाडे, प्रा.डॉ. अजय राजुरकर,प्रा. बाळा मालेकर, प्रा. प्रवीण गोसाई उपस्थित होते. महाविद्यालयाच्या लोकमान्य सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या सर्व शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular