विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या ध्येयावर लक्ष्य केंद्रित करावे – पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर
विठ्ठलवाडी येथे भव्य सत्कार सोहळा ; गुरुदेव सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम.
सुरेंद्र इखारे वणी :- आजचे युग हे स्पर्धेचे आहे . या युगात विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनांपासून दूर राहून केवळ आपल्या ध्येयावर लक्ष्य केंद्रित करावे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी केले.येथील गुरुदेव सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्हा प्रचारक मारोती ठेंगणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर तसेच आवेश उपरे या विद्यार्थ्याने नीट वैद्यकीय परीक्षेत 605 गुण प्राप्त केल्याबद्दल यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व ग्रामगीता देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
पुढे म्हणाले आजच्या युगात स्पर्धा अत्यंत कठीण आहे अशा वेळी अत्यंत चिकाटीने आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. भविष्यात डॉक्टर बनून त्यांनी गोरगरिबांची सेवा करावी आणि समाजाचे ऋण फेडावे असे मत पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी राजेंद्र कोरडे हे होते. सत्कारमूर्ती पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर , आवेश उपरे, जिल्हा प्रचारक मारोती ठेंगणे तर अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य विजया दहेकर , जयवंत पारखी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद राजुरकर यांनी केले . प्रास्ताविक ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी तर आभार भास्कर सोमलकर यांनी मानले .
या सोहळ्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ समाजसेवक , गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व गुरुदेव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशस्वितेसाठी देविदास शेटे , पुंडलीक धोबे , संजय खाडे लक्ष्मण जुमनाके , ज्ञानेश्वर कडुकर , शंकर किनाके , नाना बदखल , भय्याजी तेजे, भास्कर पत्रकार, प्रकाश कुचणकर , विजय येसेकर, हरिभाऊ भट, अनिल बेलेकर , चंद्रशेखर दहेकर , शारदा बलकी , माया रासेकर, रज्जू पारखी, विनोद खापणे , प्रभा आसेकर, सिंधू गिरडकर, बेबी दानव, वृंदा पाटेकर, रजनी वकलकर , गीता झुरमुरे , मंगला डुंबरे, चंद्रकला तुराणकर , नाणीबाई ठेंगणे यांनी सहकार्य केले. व राष्ट्रवंदनेनी कार्यक्रमाची सांगता झाली .





