Saturday, July 11, 2026
Google search engine

कायरच्या विवेकानंद विद्यालयात पालक शिक्षक सभा उत्साहात संपन्न

कायरच्या विवेकानंद विद्यालयात पालक शिक्षक सभा उत्साहात संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयात दिनांक 10 जुलै 2026 रोज शुक्रवारला दुपारी 12.40 वाजता पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे,पालक शिक्षक संवाद वाढविणे, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबीवर चर्चा करणे हा सभेचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते .प्रमुख अतिथी म्हणून पालक मनोज झोडे उपस्थित होते. यावेळी सहायक शिक्षक सतीश घुले, सोनाली ठाकूर, रविकांत गोंडलावार तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सुमित शंकावार , सानिका चांदसूर्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश घुले यांनी केले. तर मनोगत व्यक्त करताना पालक प्रतिनिधी मनोज झोडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बद्दल व नियमित उपस्थितीबाबत समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे म्हणाले की पालक शिक्षक सभा हे पालक आणि शिक्षक यांच्यामधील संवादाचे महत्वपूर्ण व्यासपीठ असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक गुणवत्तवाढीसाठी तसेच त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाय योजना करण्यासाठी अशा सभांचे मोठे महत्व आहे . असे प्रतिपादन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत गोंडलावार यांनी केले तर आभार सानिका चांदसूर्य हिने मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी शिपाई आकाश बोरूले, कनिष्ठ लिपिक सचिन टोंगे, वर्ग 9 व 10 वि च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular