धानोजी कुणबी सभागृहात योग वर्गाचा ” गुरुपौर्णिमा” उत्सव
सुरेंद्र इखारे वणी :- महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने धनोजे कुणबी समाज सभाग्रुह चिखलगाव येथे जगन्नाथ बाबा योग वर्ग व शंकरबाब देवस्थान चिखलगाव येथील शंकरबाब योग वर्गाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंतराव उपरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा अध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघ वणी हे होते तर प्रमुख पाहुणे रुपालीताई कातकडे सरपंच ग्रामपंचायत चिखलगाव, संजयभाऊ पिंपळशेंडे माजी सभापती पं.स.वणी, लक्ष्मण इद्दे राज्यउपाध्यक्ष, रामराव गोहोकार मुख्य संघटक, अशोक पारखी, मारोती उपरे,सौ.ममता श्रीवास्तव महिला प्रभारी,सौ.वनीता क्षीरसागर योग शिक्षिका उपस्थित होते.
याप्रसंगी पतंजली ऋषी व जगन्नाथ बाबाच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करून पतंजली ऋषीची प्रार्थना घेण्यात आली.
गुरुपौर्णिमेचे महत्त्व,भारतीय संस्कृती मधील गुरु शिष्य परंपरा,आई वडील व गुरुच्या प्रती आदर व क्रुतज्ञता व्यक्त करणे व सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगा चे महत्व याबाबत सौ.रुपालीताई कातकडे, श्री.संजयभाऊ पिंपळशेंडे,श्री.अशोक पारखी व श्री.वसंतराव उपरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.लक्ष्मण इद्दे यांनी केले व सूत्रसंचालन श्री.नाना विधाते यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष श्री.दिगंबर गोहोकार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.अरुण झाडे,श्री.संजय पोटदुखे,श्री.तानाजी पाऊनकर,श्री.मधूकर पूसदेकर,श्री.कवडू नागपूरे,श्री.सारनाथ सोनटक्के,श्री.अशोक ढवळे,श्री.संजय बदखल,सौ.सुनिता झाडे,सौ.वीणा गोहोकार,सौ.रेखा उपरे,सौ.ताई पोटदुखे,सौ.निता श्रीपदमावार,सौ.ताई पूसनाके,सौ.रूक्माताई गारघाटे,सौ.लता पारखी,सौ.वर्षाताई कोटकर यांनी सहकार्य केले.






