Saturday, August 1, 2026
Google search engine

वणीत महिला पतंजली योग समितीद्वारे “गुरुपौर्णिमा उत्सव” उत्साहात साजरा

वणीत महिला पतंजली योग समितीद्वारे “गुरुपौर्णिमा उत्सव ”  उत्साहात साजरा

सुरेंद्र इखारे वणी      :-     येथील महिला पतंजली योग समितीद्वारे दिनांक 30 जुलै 2026 रोज गुरुवारला हनुमान मंदिर जिल्हा परिषद कॉलनी वणी येथे ” गुरुपौर्णिमा ” हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला पतंजलीच्या तालुका अध्यक्ष सौ मायाताई माटे ह्या होत्या.   प्रमुख अतिथी  प्राध्यापक श्रीमान महादेवराव खाडे सर,  कोअर कमिटीच्या सर्व सदस्या योग वर्गाच्या मुख्ययोग शिक्षिका योगशिक्षक बोबडे सर नंदगिरीवार भाऊ, दहेकर साहेब ,उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात स्वामीजींच्या पूजनाने करण्यात आली यामध्ये सहभागी महिला रंजना बहादे, स्नेहलता कुचनकर, वंदना गिन्नलवार ,यांनी आपल्या भजनातून गुरु महिमा अतिशय सुंदर सादर केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक महादेवराव  खाडे सर यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवसी गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे महत्व तसेच  गुरु विषयीची कृतज्ञता त्याबरोबरच स्वामीजींच्या कार्याचे वर्णन योग विषयक माहिती आणि योगाचा प्रचार प्रसार कसा करता येईल याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन  केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षा  मायाताई माटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन गुरुचा महिमा आणि योगाचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त कसा करता येईल आणि आपल्या वणी चे नाव यवतमाळ जिल्ह्यात कसे उज्वल करता येईल यासाठी स्त्रियांना प्रेरित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ कुंदा सावसाकडे यांनी केले तसेच  सूत्रसंचालन सीमा बालगुनी यांनी केले तर  आभार मीडिया प्रभारी अलका त्रंबके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खोकले ताई ,वर्षा जोगी ,सोनाली विरुडकर ,मनीषा घुगुलl , तसेच  योगसाधक भगिनी योग शिक्षिका भगिनी व  मुलानी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular