वणी मध्ये नशामुक्ती पथसंंचालनाचे आयोजन !
सुरेंद्र इखारे वणी :- शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय, औषधी शास्त्र निर्माण विभाग आणि शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वणी नगरामध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने नशा मुक्ती पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले.
लोकमान्य टिळक सभागृहामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वणीचे भूषणीभूत सुपुत्र लोकनायक बापूजी आणि डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमांना प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाचा आरंभ झाला.
लोकमान्य टिळक महाविद्यालयापासून टिळक चौक, शिवाजी चौक, गांधी पुतळा, टागोर पुतळा असे करत टिळक चौकात श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या पथसंचलनाचा नशा मुक्तीच्या घोषणांनी आणि राष्ट्रगीताने समारोप झाला.
यामध्ये प्रा.किशन घोगरे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या चमूने, डॉ. नीलिमा दवणे आणि डॉ. विकास जुनगरी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमूने, प्राचार्य सुधाकर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात औषधी शास्त्र निर्माण विभागाच्या चमूने आणि सतीश मडावी यांच्या मार्गदर्शनात शिक्षण प्रसारक मंडळात विद्यालयाच्या चमूने भाग घेतला. विद्यालयाच्या घोष पथकाने अत्यंत सुंदर वातावरण निर्मिती केली.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीनही घटक संस्थांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील या पथसंचालनामध्ये सहभागी झाले होते.





