भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाणदिनी अभिवादन
नागपूर ( जयंत साठे ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरीनिर्वाणदिनानिमित्त संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास श्री. बाबासाहेब देशमुख, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या हस्ते माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरीनिर्वाणदिनानिमित्त बाबासाहेब देशमुख, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी श्री. सुखदेव कौरती, समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, श्री. भारत मेश्राम, श्री. मनोहर उचे, श्री. दिपक कुसरे, श्री. दिनेश सुखदेवे, श्रीमती अनामिका बाराहाते, श्रीमती छाया बागडे, श्रीमती जयश्री धवराळ, श्रीमती आरती सुखदेवे, श्रीमती ज्योती मानके, श्री. निखिल मेश्राम, श्री. शैलेश चव्हाण, श्री. गणेश बच्छे, श्री. हेमंत खवशी, श्री. संतोष दहागावकर, श्री. विवेक दांडेकर, श्री. विवेक गजभिये, श्री. अमीत कांबळे, श्री. शुभम तल्हार इ. तसेच प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते