प्रतिष्ठित नागरिक नागोराव आवारी यांचा अपघातात मृत्यू
वणी सुरेंद्र इखारे :- येथील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नागोराव आवारी यांचा आज दि २५ डिसेंबर सकाळी ११.३० वा अपघातात मृत्यू झाला .ते सकाळी जगन्नाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी जात असताना मंदिराजवळ भरधाव दिशेने येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. सुरुवातीला त्यांना लोढा येथे भरती करण्यात आले होते. रुग्णाचे गांभिर्य लक्षात घेऊन डॅॉक्टरांनी त्यांना नागपूरला हलविण्यास सांगितले.आज दुपारी २.३० च्या सुमारास नागपूर येथील आरियस हाॅस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे मागे पत्नी, मुलगा,दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. ते इच्छा शक्ती योगा गृपचे संस्थापक सदस्य होते.