Saturday, March 15, 2025
Google search engine

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला
सुरेंद्र इखारे वणी:-
दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
दि. 15 जानेवारी बुधवारला ‘ शककर्ते शिव छत्रपती ‘ या विषयावर पुणे येथील प्रसिद्ध वक्ते अक्षय चंदेल पहिले पुष्प गुंफनार आहे. या प्रसंगी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, वि.सा. संघ. शाखा-वणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे हे उपस्थित राहणार आहेत. हे पहिले पुष्प प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणी कडून प्रायोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
दि. 16 जानेवारी गुरुवारला या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प जळगाव येथील प्रसिद्ध वक्ते रविंद्र पाटील ‘शापित राजहंस ‘ (छ. संभाजी महाराज) या विषयावर गुफणार आहेत. या पुष्पाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा, शासकीय कंत्राटदार नितीन रमेश उंबरकर हे उपस्थित राहणार आहेत. दुसरे पुष्प स्व. रमेश उंबरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नितीन रमेश उंबरकर यांनी प्रायोजित केली आहे.
नगर वाचनालय प्रांगनात सायंकाळी 7 वाजता होणाऱ्यांना व्याख्यानमालेसाठी वणीकर नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगर वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular