Saturday, July 19, 2025
Google search engine

वणीत तिरळे कुणबी समाज संघटनेचा “विद्यार्थी गौरव व समाज मेळावा ” 

वणीत तिरळे कुणबी समाज संघटनेचा “विद्यार्थी गौरव व समाज मेळावा ” 
सुरेंद्र इखारे वणी   :-  येथील धानोजे कुणबी समाजभावनात दिनांक 25 जानेवारी 2025 रोज शनिवारला सकाळी 10.30 वाजता तिरळे कुणबी समाज संघटना, वणी तालुक्याच्या वतीने ” विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्याचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी व तिरळे कुणबी समाज संघटनेचे  माजी अध्यक्ष डॉ. शांतारामजी ठाकरे उपस्थित राहणार आहे. तसेच  तिरळे कुणबी समाज संघटना भद्रावतीचे उपाध्यक्ष वसंतराव मानकर, प्राचार्य प्रशांत गोडे, जेष्ठ समाजसेविका निलीमाताई काळे व तिरळे कुणबी समाज संघटना वणी चे संस्थापक डॉ. मोरेश्वर महाजन, डॉ. अंकिता इंगोले (शिरकांडे) आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समाज संघटनेच्या वतीने वणी तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, समाज भूषण पुरस्कार तसेच सामाजिक, सांस्कृतिक कृषी व व्यवसायिक क्षेत्रात समाजपयोगी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी वणी तालुक्यातील सर्व सन्माननीय समाज बांधवांनी या समाज मेळाव्यास सहकुटुंब व परिवारासह मोठ्या प्रमाणात आवर्जून उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन तिरळे कुणबी समाज‌ वणी तालुक्याचे अध्यक्ष कार्तिक देवडे, सचिव अशोकराव चौधरी व पदाधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular