वणी येथील जैताई मंदिरात चैत्र नवरात्राचे निमित्ताने विविध दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी
सुरेंद्र इखारे वणी :-
येथील ग्रामदेवता असलेल्या जैताई मंदिरात चैत्र
नवरात्रात दि. ३१ मार्च ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत विविध
दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.३१ मार्च, २ एप्रिल व ३ एप्रिल रोजी अनुक्रमे
ह..भ.प.मकरंद हरदास, सौ. नुपूर देशपांडे
व सौ.वर्षा मुलमुले
नागपूर यांची सुश्राव्य कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. दि.१ एप्रिल रोजी महाराष्ट्र टाइम्स विदर्भ आवृत्तीचे सहाय्यक संपादक अविनाश
महालक्ष्मे यांच्या ‘ घानमाकड ‘ या लेखकाच्या
शिरपूर येथील ग्रामीण जीवनातील अनुभवावर
आधारीत पुस्तकाचे पुनर्प्रकाशन वणीकर मित्रांच्या
आग्रहाखातर डॉ. संध्या पवार नागपूर (- मूळच्या
मुकुटबनच्या – यांच्या हस्ते होणार आहे.
दि.४ एप्रिल रोजी चिटणवीस सेंटर , नागपूर प्रस्तुत
नात्यातील गाणी हा अभिवाचनाचा अभिनव कार्यक्रम
सौ.शुभदा फडणवीस व रविंद्र दुरुगकर, नागपूर
सादर करणार आहेत. कार्यक्रमाची संहिता सुप्रसिद्ध
लेखक उदयन ब्रह्म यांची आहे. पुस्तक प्रकाशन व अभिवाचनाचा कार्यक्रम स्थानिक विदर्भ साहित्य संघ
व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आहे.
दरवर्षी पू.मामा क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी होणारा
कार्यक्रम दि.५ एप्रिल रोजी होणार आहे.या
विशेष स्वरुपात होणाऱ्या कार्यक्रमात लोकबिरादरी प्रकल्प,हेमालकसा येथील अनिकेत व समीक्षा आमटे
या दांपत्याला त्यांच्या दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी भागातील अबोल व अजोड शैक्षणिक कार्याबद्दल
प्राचार्य राम शेवाळकर स्मृति ‘ शिक्षणव्रती ‘ पुरस्कार
देऊन गौरविण्यात येणार आहे.हा पुरस्कार त्यांना नागपूर येथील ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते
प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप
११००० रुपये रोख,शाल , श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे आहे.हे सर्व कार्यक्रम रोज सायं. ७ वाजता होणार आहे. तेव्हा वणीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.