Wednesday, November 12, 2025
Google search engine

भारतीय सैन्याच्या शौर्याला समर्पित तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – आ. किशोर जोरगेवार*

भारतीय सैन्याच्या शौर्याला समर्पित तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – आ. किशोर जोरगेवार

17 मे ला शहरातुन निघाणार तिरंगा रॅली, नियोजन बैठक संपन्न

सुरेंद्र इखारे वणी   :-   आपल्या जवानांनी दाखवलेली धैर्यशीलता, रणनीती आणि समर्पण हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान निर्माण करणारे आहे. त्यांचे हे योगदान केवळ सीमारेषेवरच नव्हे, तर देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहे. ऑपरेशन सिंदुर च्या यशानंतर सैन्याच्या पराक्रमाचा गैरव वाढविण्यासाठी आयोजित होत असलेल्या तिंरगा रॅलीत सर्व देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
ऑपरेशन सिंदूर च्या यशा नंतर भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी, सैन्याच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात तिरंगा रॅली काडण्यात येणार आहे. या अंतर्गत चंद्रपूर मतदार संघातही 17 मे ला रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 5 वजता शिवाजी चौकातून सदर रॅली काडण्यात येणार आहे. याची नियोजन बैठक आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेत कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे ओबीसी नेते अशोक जीवतोडे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुविर अहिर, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, नामदेव डाहुले, माजी नगर सेवक सुभाष कासगोट्टूवार, प्रकाश देवतळे, मनोल पाल, प्रदिप किरमे, श्याम कणकम, राहुल घोटेकर, देवानंद वाढई, पुष्पा उराडे, शितल आश्राम, कल्पना बबुलकर, राजु अडपेवार, सविता दंढारे, शितल गुरुनुले आदिंची प्रमुख्तेने उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे, ज्यामार्फत आपण आपल्या सैन्याच्या पराक्रमाला सलाम करणार आहोत. याच रॅलीचा भाग म्हणून चंद्रपूर मतदार संघातही भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात येणार आहे. सर्वजण एकजुटीने ही रॅली लोकसहभागात पार पाडू. ही केवळ एक मिरवणूक नसून, भारतीय सैनिकांप्रती असलेला आदर, एकता आणि राष्ट्रप्रेमाची भावना जनतेसमोर व्यक्त करण्याचे हे एक सशक्त माध्यम आहे. या रॅलीमध्ये तरुण वर्ग, महिला मंडळं, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्था, शाळा-विद्यापीठांचे विद्यार्थी, विविध समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे. या रॅलीत प्रत्येकाच्या हातात तिरंगा आणि मनात मातृभुमीसाठी अभिमान असेल असेही ते यावेळी म्हणाले. या बैठकीत रॅलीचे उत्तम नियोजन करण्यात आले. तसेच आलेल्या सुचना विचारात घेण्यात आल्या. बैठकीला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular