*लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड*
सुरेंद्र इखारे वणी :- लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना यावर्षी ही लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट च्या ‘मानवता सन्मान’ नागपूर, या कार्यक्रमात बेस्ट प्रेसिडेंट या अवॉर्ड नी सन्मानित करण्यात आले.
तसेच लायन्स क्लब वणीला प्ल्याटिनम GMT अवॉर्ड,
बेस्ट क्लब डिस्ट्रिक्ट अवॉर्ड,GMT Achievements प्ल्यटिनम अवॉर्ड
या तीन अवॉर्ड नी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.रीपल राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे राजाभाऊ पाथ्रडकर यांना मागील वर्षीही रीजन व डिस्ट्रिक्टचा ‘बेस्ट प्रेसिडेंट’ अवॉर्ड मिळाला होता.
लायन्स क्लब वणी चे पदाधिकारी व सदस्य माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, बलदेव खुंगर, किशन चौधरी, नरेंद्र बरडीया, रमेश बोहरा, सुधीर दामले,तुषार नगरवाला, चंद्रकांत जोबनपुत्रा, शमीम अहमद, रमेश बोहरा, महेंद्र श्रीवास्तव डॉ. के. आर. लाल, दत्तात्रय चकोर, प्रमोद देशमुख, एस. बी. पांडे, पुरूषोत्तम खोब्रागडे, प्रशांत गोडे, चित्रा देशपांडे व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.




