बुद्ध जयंती निमित्त बुद्ध भिमगीताचा कार्यक्रम संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- वणी येथील सम्यक महीला मंडळ देशपांडे ले आऊट नांदेपेरा रोड वणी येथे दिनांक 10 मे 2026 रोज रविवारला बुद्ध जयंती निमित्त बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सुप्रसिद्ध गायक प्रा.प्रवीण राजहंस सर आणि त्यांचा संच पुसद यवतमाळ यांनी अनेक बुद्ध भीम गीत सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सदर कार्यक्रमाला बाहेरील व गावातील बहुसंख्य बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता प्रदीप खैरे यांनी केले तर प्रास्ताविक सुचित्रा राजवर्त कांबळे यांनी केले शेवटी आभार संगीता पंढरी वनकर यांनी मानले.
तसेच प्रदीप खैरे यांनी सम्यक महिला मंडळ यांना सहकार्य केले





