गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार आणि समाज प्रबोधन मेळावा.
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील कुणबी समाज संघटनेच्या वतीने शेतकरी मंदिर येथे दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि समाज मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. त्यात शंतनु चौधरी, धनंजय इंगोले, आरोही जाधव, अंशुल गोडे, मयुर गावंडे, श्रावणी भोयर, रिया हरके , होमेश्वरी गाभोळे , आर्या सुके, आर्या चौधरी, ईशांत उमक , सोहम पोहेकर, आरुष खराटे , पार्थ साखरकर, लुकेश्वरी चौधरी, प्राजक्ता भोयर, प्रज्वल चरडे , श्रावण पठाडे यांचा समावेश आहे. प्रतिकूल परिस्थितीत स्वकष्टाने मात करून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या ईश्वरी राऊत, मोहीन हिवरकर, डॉ साक्षी भोयर, नीलिमा काळे, नारायण गोडे, विजय ढाले, सुभाष इंगोले, वैशाली वातीले , प्रेमीला चौधरी यांचा स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला . याप्रसंगी भव्य महिला आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यात समाजातील डॉ प्रज्ञा महाजन, पूजा काळे साक्षी भोयर यांच्या हस्ते आरोग्य तपासणी पार पडली समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची कास धरणे अत्यंत गरजेचे आहे आजच्या तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन महापौर संगीता खांडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. उद्घाटन प्रसंगी ते विद्यार्थ्यांना प्रेरित करीत होते. आजच्या बदलत्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाणे ही काळाची गरज आहे असे मत युवा जिल्हाध्यक्ष,बिपीन चौधरी यांनी व्यक्त केले. सत्कार सोहळ्यानंतर आयोजित समाज मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते . जिजाऊ वंदना विशाखा चौधरी, स्वागतगीत वैशाली तायडे, वैष्णवी लिमये तर नृत्य सादरीकरण चिमुकली भार्गवी महाजन यांनी केले.
अध्यक्षस्थानी नारायण देवडे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून चंद्रपूर येथील महापौर संगीता खांडेकर, मार्गदर्शक तहसिलदार, निखिल धूळधर, मुख्याधिकारी डॉ सचिन गाडेकर, यांच्या पाहुणे म्हणून नरेंद्र ठाकरे, सर्व शाखीय कुणबी समाजाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी, वणी, केळापूर व मारेगाव येथील तालुकाध्यक्ष आशिष काळे, अशोक बेले, प्रकाश पवार तसेच राजेंद्र खांडेकर, वसंतराव पडोळे, डॉ राऊत, प्रा देविदास गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. प्रास्ताविक आशिष काळे तर उपस्थितांचे आभार प्राचार्य प्रशांत गोडे यांनी मानले.राष्ट्रवंदनेनी कार्यक्रमाची सांगता झाली.
यशस्वितेसाठी जयंत देवडे, अशोक चौधरी, राहुल इंगोले, संतोष भेले , मनीष चौधरी, कार्तिक देवडे , मनोज चौधरी, सचिन पोहेकर, प्रशांत गोमकर , सुमित्रा गोडे, वैशाली तायडे, सविता रासेकर , वैशाली वातीले कार्यकारीणीचे सर्व सदस्य व समाजबांधवांनी सहकार्य केले.




